ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोज केले जाते.
मराठी भाषा गौरवदिनी पुस्तकांचं प्रकाशन
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन प्रसिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. कोरोना सारख्या महासंकटातदेखील सदर परंपरा खंडित न होऊ देता मंडळाकडून अत्यंत मौलिक अशा 14 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात येत आहे.
बऱ्याच जणांना याची माहिती नसते की मराठी भाषा दिन नक्की का साजरा केला जातो याची काही जणांना अजूनही माहिती नाही. नव्या पिढीला तर धड मराठी बोलताही येत नाही आणि लिहिण्याचे तर काही न बोलले तरच बरे. पण प्रत्येक मराठी भाषा असणाऱ्या व्यक्तीला मराठीचा सार्थ अभिमान असतो आणि असा मराठी भाषा दिन विशेष साजरा करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. याला मराठी भाषा गौरव दिन असंही याला म्हणतात.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी समस्त मराठीजनांची मागणी आहे. माय मराठीचा प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ सुरेश भटांच्या या ओळी आपल्याला मराठीचा अधिक अभिमान जागृत करण्यासाठी नक्कीच स्फुरतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. खरं तर मराठी भाषेचा उगम हा उत्तरेकडे झाला असून मराठी भाषा ही मूळ आर्यांची भाषा आहे. साधारण 1500 वर्षांची इतिहास जपणारी ही भाषा आहे. प्रामुख्याने ही भाषा भारताच्या दक्षिण भागामध्ये विकसित झाली. मराठी भाषेचा पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश असा उत्क्रांत होत आता मराठी भाषा एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहचली आहे.
मराठीवरचे प्रेम आंतरिक जाणिवेतून प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही. माय मराठीचा जयजयकार करताना आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शिक्षक आणि विद्यार्थी स्वाक्षरी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या.
काळाप्रमाणे मराठी भाषा ही स्थळानुसारही बदलत गेली. मराठी बोलीभाषा आणि मराठी प्रमाणभाषा असेही याचे भाग दिसून येतात. पण काहीही असलं तरीही मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून गौरविण्याचा आणि साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला आणि तेव्हापासूनच हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
मान आहेत मराठी भाषेचा आपल्या मनी,
शुभेच्छा तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनी..
Comments
Post a Comment